महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांची शिरूर शहरात प्रचार रॅली..

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरात महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांची आज प्रचार रॅली निघाली होती या रॅलीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
             आज सकाळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. 
               शिरूर शहरातील पेट्रोल पंप ,एसटी स्टँड, बाजारपेठ कापड बाजार आडत बाजार रामवाडी , मारुतीआळी सरदार पेठ, लाटे आळी, हलवाई चौक, सुभाष चौक ,सोनारआळी, इस्लामपुरा, ,बुरुडआळी कुंभारआळी, मुंबई बाजार, डंबेनाला, या भागातून या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत कटके यांचे स्वागत केले.
            यावेळी शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद कालेवार, शिवसेना शहराध्यक्ष मयूर थोरात, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे,आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव, श्रुतिका झांबरे, सुनिल जाधव, स्वप्नील रेड्डी आजी-माजी नगरसेविका, विविध संघटनेचे कार्यकर्ते महिलावर्ग या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाला होता.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!