लँड माफिया सॅड (वाळू)माफिया एमआयडीसी माफिया यांची गॅंग विरोधकांकडून काम करते - अशोक पवार

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       माझ्या विरोधात समोरच्या उमेदवाराकडे लँड माफिया सॅड (वाळू)माफिया एमआयडीसी माफिया यांची गॅंग विरोधकांकडून काम करत असल्याचा आरोप शिरूर चे आमदार अशोक पवार यांनी करून नागरिका हो मतदाराहो तुम्हीच पहा यांचा नक्की उद्देश काय आहे , तुम्हाला पण माहिती आहे.
          मी शिरूर हवेली त माझ्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये या दोन्ही भागाचा विकास हा मुद्दा घेऊन अनेक विकास कामे या परिसरात आणली आहे.
            विकास कामे करताना अनेक अडचणी आल्या परंतु त्यावर मात करत विकासा माझा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. शिरूर तालुक्यातील व हवेली तालुका सुजलाम सुफलाम करणे हाच माझा ध्यास होता. काहींना तो पटला नाही व गैर मी करत नाही हे सर्वांनाच माहिती आहे. एखाद्याची खरी अडचण असेल तर मग जो चुकीचे काम करत असेल  खैर नाही परंतु सर्वसामान्य गोरगरीब जनता शेतकऱ्यांची कामे झाली पाहिजे छोट्या छोट्या कामांसाठी या लोकांना हेलपाटे मारायला लावू नये हा माझा उद्देश आहे. आणि तो मी कितीही विरोध झाला तरी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अहोरात्र काम करणाराच आहे. 
           ते शासकीय असो वा रुग्णालयाचे असो यामध्ये कुठे कमी पडणार नाही. समोरचे उमेदवार आणि त्यांच्याबरोबर असणारे बगलबच्चे हे फक्त त्यांच्या कामासाठी गुळाला मुंगळे चिकटले आहे. त्यांना फक्त गैर कामात मदत करावा असा माणूस हवा आहे. म्हणूनच ते माझ्या विरोधात जाऊन काम करत असल्याची आमदार अशोक पवार यांनी सांगून यापुढील काळामध्ये शिरूर व हवेली तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय असणार आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!