शिरूर तालुक्यातील वडगाव रासाईत बिबट्या जेरबंद... मांडवगण फराट्यातील घटनेपासून एक किलोमीटर अंतरावर

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई मांडवगण फराटा शिवेवर शेलारवाडी येथे बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, हा परिसर फराटवाडी येथून एक किलोमीटर अंतराचा असल्याचेही वनाधिकारी यांनी सांगितले. 
        मांडवगण फराटा येथे १९ ऑक्टोबर रोजी बिबट्याने हल्ला केल्याने एका लहानग्याचा मत्यू झाला होता. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पाच वर्षे शिवतेज टेंभेकर याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या भागातील नागरिक संताप्त झाल्याने पण मी वाघाच्या वतीने या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्या जेरबंद व्हावे यासाठी पिंजरे लावली होते 
          या परिसरात व त्या पासून एक किलोमीटर अंतरावर पर्यंत बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरे लावले होते यू दरम्यान मंगळवार दिनांक 26 रोजी पहाटे आदिनाथ पापळ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या भक्ष खाण्यासाठी आला असता अलगद अडकला. 
       
        गेल्या महिन्याभरात मांडवगण फराटा येथे दोन चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यानंतर हा नरभक्षक बिबट्या वन विभागाला पकडता आला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. 
         तर वडगाव रासाई मांडवगण शिवेवर शेलारवाडी येथे बिबट्याचे अस्तित्व असल्याचे वन विभागाला समजले होते त्यात टेंभेकर यांच्या मृत्यूनंतर तो राहत असलेल्या फराटवाडी पासून एक किलोमीटर अंतरावर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात होते आले होते . त्यातच हा बिबट्या जेरबंद झाला आहे.
        घटनास्थळाला शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी कंक यांनी भेट दिली असून, बिबट्या जेरबंद झाला म्हणून नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून वन विभागाचे ही आभार मानले आहे .
दरम्यान मांडवगण फराटा परिसरात अनेक ठिकाणी बिबटे सातत्याने दिसत येत असून केवळ एकच बिबट्या जेरबंद झाला आहे मात्र या भागात अनेक बिबटे आढळत असून वन विभागाने यावरच न थांबता परिसरातील जेवढे शक्य होतील तेवढे बिबटे जेर बंद करावेत तरच या भागातील ग्रामस्थ भयमुक्त होतील त्यामुळे वन विभागाने कुठलेही काम थांबू नये अशी मागणी राजीव पाटील फराटे यांनी केली आहे.
मांडवगण फराटा गावात बिबट्याने दोन लहान मुलावर हल्ले केले होते. त्या मुलांचं दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे या बिबट्याची पूर्ण तपासणी करावी जर जेणेकरून जेणेकरून ज्या मुलांवर हल्ला केला होता.त्याची खात्री होईल. अशी मागणी सरपंच समीक्षा अक्षय फराटे यांनी केली. 
          मराठवाडी घटनेनंतर या परिसरातील एक किलोमीटर अंतरापर्यंत बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले होते त्यात पैकी एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे.वडगाव रासाई मांडवगण शिवेजवळ पकडलेला बिबट्या मादी बिबट्या असून हा पूर्ण वाढ झालेला आहे. त्याला माणिक डोह बिबट्या निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे. बिबट्याला सोडण्यासाठी स्थानिक नागरिक ही गेले होते.
    भानुदास शिंदे, वनपाल मांडवगण फराटा 

          


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!