शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायती व गावांनी थंडीचे दिवस सुरू झाले असून या दिवसात मोठ्या प्रमाणात चोऱ्या, दरोडे ,रोड रॉबरी गुन्हे घडत असतात त्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे गावात कुठल्याही प्रकारचा संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन शिरूर ते पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी करून प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करणार असल्याची सांगितले.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गुणाट या ठिकाणी जबरी चोरीचा गुन्हा घडला असून यात महिलेला मारहाण करून तिचे कान कापून कानातले ओरबडून नेले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल शिरूर पोलीस स्टेशन ने घेत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच यांची आज बैठक बोलावली होती त्यावेळी पोलीस निरीक्षक केंजळे यांनी मार्गदर्शन केले.
ज्या गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नाही त्या गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात यावे, गाव मध्ये गाम सुरक्षा दल सीसीटीव्ही कॅमेरे बसून सर्व पोलीस पाटील यांनी गाव मध्ये लोकांच्या मदतीने रात्रगस्त घालावी गावात कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तसेच एखादा संशयित आढळून आल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनला कळवावे असे आव्हान यावेळी केंजळे यांनी करून, गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करताना कुठली अडचण येत असेल तर ती सोडवण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
आपले गाव आपले शहर सुरक्षित राहावे यासाठी तरुणांनी ग्राम सुरक्षा दलात सहभागी व्हावे अस आवाहन केंजळे यांनी केले.