26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहीद जवानांना शिरूर येथे पुष्पचक्र व मेणबत्ती लावून अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिरूर येथील वीर जवान अभिवादन समितीच्या वतीने गेली 15 वर्षापासून या जवानांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो.
यावेळी शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते वीर जवानांना पुष्पचक्र वाहण्यात आले तर मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, शिरूर वकील संघटनेचे अध्यक्ष अमित खेडकर, मनसेचे मेहबूब सय्यद, बाबुराव पाचंगे, अनिल बांडे,सुनील करळे, डोंगरे, प्रकाश बाफना, योगेश महाजन, सुनील जाधव, एजाज बागवान, अजीम सय्यद, निलेश नवले, गणेश खोले, प्रितेश फुलडाळे, खुशाल गाडे, डॉ. वैशाली साखरे
उपस्थित होते.