कंपनीतून तात्पुरता कामगारचोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद
( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील एल जि इलेक्ट्रोनिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीतील तब्बल अठरा टीव्ही चोरीला गेल्याची घटना घडून कंपनीतील तात्पुरता कामगार चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे अजय भीमराव जाधव या कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील एल जि इलेक्ट्रोनिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीतील वेगवेगळ्या तीन बिल्डींग मधून फ्रीज, टीव्ही, एसी तसेच वाशिंग मशीन बनवले जातात, कंपनी मधील शिल्लक मालाचा साठा १ ऑक्टोबर रोजी तपासत असताना त्यांना कंपनीतील त्रेचाळीस इंची तब्बल सतरा टीव्ही नसल्याचे दिसल्याने आले, त्यांनतर पुन्हा १३ ऑक्टोबर रोजी शिल्लक मालाचा साठा तपासत पासष्ट इंची एक टीव्ही कमी असल्याचे निदर्शनास आल्याने कंपनी व्यवस्थापकांनी कंपनीतील सीसीटीव्ही तपासले असता एक कामगार पासष्ट इंची टीव्हीचा बॉक्स बाहेर घेऊन जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आल्याने चौकशी केली असता सदर कामगार हा ए बिल्डींग मधील फ्रीज तयार होणाऱ्या ठिकाणी ठेकेदारीतून तात्पुरता कामगार असल्याचे निष्पन्न झाले, त्यांनतर त्या कामगाराबाबत चौकशी केली असता सदर कामगार दहा दिवसांपासून कामावर नसल्याचे दिसून आले, याबाबत एल जि इलेक्ट्रोनिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचे टीम हेड लॉजिस्टिक उमेश कुमार पांडे वय ५२ वर्षे रा. विजय विहार वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजय भीमराव जाधव रा. जमशेदपूर ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण हे करत आहे.