शिरूर हवेली मतदार संघातील विकास काम नाही करणारा विकास पुरुष प्रगल्भ नेता म्हणून आमदार अशोक पवार यांच्याकडे पाहिले जाते वाघोली व परिसरातील विकासाबाबत सर्वज्ञात असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे शिरूर हवेली बरोबर त्यांनी पुणे जिल्ह्यातही नेतृत्व करावे यासाठी मी त्यांना पाठिंबा देत असल्याचे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शांताराम कटके यांनी जाहीर केले.
काल दिनांक चार नोव्हेंबर रोजी शांताराम कटके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि लगेचच आज शिरूर हवेली आमदार ॲड. अशोक पवार यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी संजय सातव ,राजेंद्र सातव,कैलास सातव,कमलाकर सातव,बाळासाहेब सातव,जयश्री ताई सातव,ज्योती पाचारणे,युवराज दळवी,,बाळासाहेब शिवरकर,शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे,राजेंद्र पायगुडे,संतोष सातव,सोमनाथ आव्हाळे,बाळासाहेब हरगुडे मोठ्यप्रमाणावर कार्यकर्तेही उपस्थित होते.
यामुळे महायुती मधील एक चांगला मोहरा महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारात उतरला असून यामुळे वाघोली परिसरात पवार यांना फायदा होणार आहे.
कालच उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शांताराम खटके यांनी पक्षाने विश्वासात न घेतल्याचा राग मनात ठेवून नाराजी व्यक्त केली होती आणि आज त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना पाठिंबा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी उमेदवारीचा अर्ज माघारी घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मी अनेक वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. अजित पवार यांच्या विचारांचा सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार गेल्या अनेक वर्षापासुन मी करत आहे. राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत जे इच्छुक उमेदवार होते. त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा होती. परंतु पक्षाचा कुठलाही काडीमात्र संबंध नसलेला, अजित पवार यांच्या विचारांची कास नसलेला उमेदवार आयात केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणुन मला खंत वाटली. एवढ्या दिवस राष्ट्रवादी पक्षाचा एकनिष्ठ तसेच कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांची पाठ न सोडणारा मी कार्यकर्ता असताना सुद्धा माझी योग्यता पक्षाला समजली नाही याची खंत वाटते.’