जांबुत शिरूर येथे पावणे नऊ लाखाची मशनरी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
       जांबुत ता.शिरूर येथे दुग्ध व्यवसाय साठी आणलेली मशनरी व जनरेटर असा एकूण पावणे नऊ लाखाचा ऐवज चोरून नेणाऱ्या चोरट्याला शिरूर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.
       एकनाथ नारायण फलके (रा जांबुत, फलकेवस्ती ता शिरूर जि पुणे) याला पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
      अभिजीत भाउ कोल्हे, (वय २५ वर्ष, व्यवसाय दुग्ध व्यवसाय, रा.चोंभुत ता पारनेर जि अहमदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
        याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान जांबुथेतील तानाजी जगताप यांच्या गाळ्यामध्ये. अभिजीत कोल्हे यांनी दुग्ध व्यवसायासाठी आणलेली महिंद्रा कंपनीचे जनरेटर व बल्क मिल्क कुलर युनिट एकूण किंमत ८ लाख ७४ हजार २६२ ही मशनरी ठेवली असताना गाळ्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली होती. 
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकामधील अधिकारी व अंमलदार तपास करीत असताना जांबुत, फाकटे, कवठेयमाई, मलठण, कान्डुरमेसाई या गावामधील सुमारे ५० पेक्षा अधिक सी.सी. टि.व्ही कॅमेरे तपासुन व तांत्रीक विश्लेशनाचे आधारे एकनाथ नारायण फलके (रा जांबुत, फलकेवस्ती ता शिरूर जि पुणे) याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गुन्हयाचे चौकशी करीता ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हयाची कबुली दिली असून ,आरोपीने रात्रीचे वेळी सदरची घडफोडी करून चोरी केलेले महींद्रा कंपणीचे जनरेटर व बल्क मिल्क कुलर युनिट किंमत ८ लाख ७४ हजार २६२ रूपये हे गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आले आहे.   
        ही कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस अमंलदार निरज पिसाळ, विजय शिंदे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, निखील रावडे, यांचे पोलीस पथकाने केली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!