शिरूर
( प्रतिनिधी ) कारेगाव ता. शिरुर येथील एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे कृष्णा हनुमंत नाईक, मीराबाई हनुमंत नाईक, राहुल हनुमंत नाईक, सायली राहुल नाईक या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कारेगाव ता. शिरुर येथील तेजश्री नाईक या विवाहितेला तिच्या पतीसह कुटुंबातील अन्य व्यक्ती वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याने तेजश्री हिने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तेजश्री कृष्णा नाईक वय २५ वर्षे रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे हिचा मृत्यू झाला, याबाबत रेवणनाथ तुळशीराम होले वय ५२ वर्षे रा. होलेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कृष्णा हनुमंत नाईक, मीराबाई हनुमंत नाईक, राहुल हनुमंत नाईक, सायली राहुल नाईक सर्व रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहे.