कारेगाव येथील मारहाणीतील फरार आरोपीला तीन महिन्यानंतर पोलिसांनी केली अटक -रांजणगाव पोलिसांची कारवाई

9 Star News
0
कारेगाव येथील मारहाणीतील फरार आरोपीला तीन महिन्यानंतर पोलिसांनी केली अटक -रांजणगाव पोलिसांची कारवाई
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
          कारेगाव ता शिरूर येथे जुलै महिन्यात महिलेला व त्याच्या मुलाला मारहाण करून फरार झालेल्या दोन आरोपींना तीन महिन्यानंतर पकडण्यामध्ये रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. 
       प्रथमेश उर्फ बच्चा संतोष नवले (वय २१), सनी परमेश्वर मस्के (वय १९,दोन्ही रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. 
      याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक ११ जुलै २४ रोजी
 रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कारेगाव येथे पाच ते सहा जणांच्या टोक्याने बेकायदेशीर गर्दी जमून जुन्या भांडणाच्या कारणवरून महिला व त्यांच्या मुलाला दगडाने हाताने मारहाण केली होती याबाबत रांजणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु यातील दोन आरोपी गेल्या तीन महिन्यापासून फरार होते. याबाबत पोलिसांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निवडणुकी काळात निवडणुका शांतते, भयमूक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी फरार व पाहिजे असलेले आरोपी यांचा शोध घेण्याची आदेश दिले होते.त्यानुसार दररोज नाईट राऊंड दरम्यान पाहिजे असलेले, फरार आरोपी, रेकॉर्डवरील, आर्म अॅक्टमधील आरोपी तसेच वॉरंट मधील आरोपीच चेक करणेचे आदेश पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिले होते.
नाईट राऊंड दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस हवालदार माऊली शिंदे यांनी रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या फरार आरोपींचा शोध घेत असतांना उमेश कुंतवळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेतला असता रांजणगाव पोलीस स्टेशन गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा संतोष नवले (वय 21 वर्षे, सनी परमेश्वर मस्के वय 19 दोन्ही रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) हे मिळून आले अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार कल्पेश राखोंडे हे करत आहेत.
सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा संतोष नवले हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द आर्म अॅक्ट तसेच शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असुन त्याला लवकरच पुणे जिल्ह्यातुन तडीपारीचा आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!