शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांनी अखेर विधानसभा 2024 ला उमेदवारी अर्ज मागे घेऊन राम राम ठोकला असून आता राजकारण त्यांना राम राम ठोकेल का ?
शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी कडून प्रदीप कंद हे उमेदवारी रेस मध्ये होते परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडे गेल्याने प्रदीप कंद यांची निराशा झाली होती म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. हा उमेदवारी अर्ज कायम राहील अशी चर्चा शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये होती.
कारण या विधानसभेवर मोठ्या प्रमाणात राजकीय गणित अवलंबून होती व शिरूर हवेलीचा दावेदार कोण याकडेही लक्ष लागले होते. त्यात मोठ्या प्रमाणात असलेली भारतीय जनता पक्षाची फळी ही ही आजही कंद यांच्या पाठीमागे होती. माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे नंतर प्रदीप कंद हा एकमेव असा उमेदवार होता की तो अपक्ष उभे राहून निवडणुकीत चुरस आणू शकला असता. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
भाजपा वरिष्ठांनी शिरूर हवेलीतील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद उभे करण्याच्या बद्दल शब्द दिला आहे. व महायुतीमध्ये कुठलीही गटबाजी नको यामुळे वरिष्ठाच्या सांगण्यावरून मी माझा उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतला आहे. तर महायुतीचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप कंद, भाजपा नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष