केंदुर ता. शिरूर येथे जमिनीच्या व मीटर हलवण्याच्या वादातून सख्ख्या चुलत भावाला व त्याच्या कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी व हाताने दगडाने मारहाण करून चुलत भावाला जीवे मारण्याच्या उद्देशाने कारने धडक देऊन बोनट वर पडलेल्या चुलत भावाला ५०० मीटर लांब ओढत नेले असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नऊ जणान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
याबाबत राजेंद्र नाथू थिटे (वय ४६,रा. शिक्रापूर तालुका शिरूर जि. पुणे) यांनी फिर्यादी दिली आहे.
याप्रकरणी विनायक सदाशिव थिटे, वृशाली विनायक थिटे, गणेश सदाशिव थिटे, सारीका गणेश थिटे, अमित सदाशिव थिटे, कोमल अमित थिटे, सदाशिव बुधाजी थिटे, मधुरा गणेश थिटे व अथर्व विनायक थिटे (सर्व रा. थिटे आळी केंदूर, ता. शिरूर) यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजता राजेंद्र थिटे हे आपल्या कुटुंबासह केंदूर येथील आपल्या वाटणीत आलेले शेतीवर व नवीन घराचे बांधकामावर गेले होते. त्यांच्या वाटणीत आलेल्या जांभळाच्या झाडावर त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने इलेक्ट्रिक मीटर लावला होता.
त्या ठिकाणी त्यांचे चुलत बंधू विनायक थिटे यांनी पत्रे लावल्याने ते त्यांचा मीटर दुसरीकडे हलवत असताना त्यांच्या पत्र्याला धक्का लागल्याने वरील नऊ जण आरडाओरडा करत त्या ठिकाणी आली त्यांनी ही जागा आमच्या मालकीची आहे असे म्हणून पत्रा हलवला म्हणून फिर्यादीचे चुलत बंधू विनायक यांनी फिर्यादी राजेंद्र यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेली फिर्यादीची पत्नी मुलगा यांना सुद्धा वरील आरोपींनी मारहाण केली. सर फिर्यादीची मुलगी याचे शूटिंग मोबाईल मध्ये काढत असताना आरोपींनी तिला धक्काबुक्की करून जमिनीवर पाडून मोबाईल हिसकून घेतला. त्यानंतर फिर्यादी व त्याचे कुटुंब रस्त्याने निघून जात असताना
विनायक सदाशिव थिटे याने त्याचेकडील मारुती इरटीगा गाडी नं MH12JC2423 यामध्ये बसुन गाडी चालवित आमचे पाठीमागे गाडी आणली त्यावेळेस मी गाडी पाहून पाठीमागे वळलो तेव्हा विनायक थिटे याने गाडीने फिर्यादीच्या उजवे पोटाला जोराची धडक दिली गाडीने ठोस दिले नंतर मी गाडीचे बोनेटवर पडलो तेव्हा मी बोनेटला धरून राहिलो तेव्हा त्याने सदर इरटिगा गाडी जवळ पास तीनशे ते पाचशे मीटर चालवित फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या पोटाला बरगड्यांना तसेच इतर ठिकाणी मुक्कामार लागलेला असुन उजवे पायाचा घोटा फॅक्चर झाला आहे. यामध्ये राजेंद्र थिटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत फिर्यादीवरून दिव्य मारण्याचा प्रयत्न मारहाण असा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक दीप रत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मळेकर करीत आहे.
*केवल कुंज* कडून आपणा सर्वांना *भाऊबीज* च्या हार्दिक शुभेच्छा! हा सण प्रेम, आपुलकी आणि आनंदाने उजळून निघो.
✨✨शिरुरमध्ये तुमच्या स्वप्नातील घर साकार करा, *केवल कुंज* च्या साथीने! 🏠💖
शिरूरच्या अतिविकसीत परिसरात भव्य गृहप्रकल्प. 🏗️
प्रशस्त हॉल, मोठ्या रूम्स, ऐसपैस बाल्कनी, मोठी लॉबी, स्वतंत्र पार्किंग, २४ तास पाणी, उत्तम वेंटिलेशन इ. या सारख्या सर्वोत्तम सुविधा एकाच ठिकाणी.
तर मग वाट कशाची पाहताय, आजच तुमचे घर बुक करा..
*केवल कुंज*
पत्ता: पुणे - नगर बायपास रोड,
टेलीफोन एक्सचेंज समोर, शिरूर, पुणे 412210
📞 संपर्क: *8272 8272 45 / 8272 8272 75*
*https://nfcc.in/BpqNGsHs*
*https://www.kewalkunj.com*