निमगाव दुडेत दोन विद्युत रोहीत्रांच्या तांब्याच्या पट्ट्या चोरी
( प्रतिनिधी ) निमगाव दुडे ता. शिरुर येथील दुडेवाडीतील घोड नदीच्या कडेचा काही ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित झाल्याने येथील विलास पवार यांनी याबाबतची माहिती विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी उमेर शेख, चांगदेव थोरवे यांनी तेथे जात पाहणी केली असता घोड नदीच्या कडेचे बबन गायकवाड यांच्या शेताजवळ असलेले दोन विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरून नेल्याचे समोर आले, याबाबत विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी उमेर निजामुद्दीन शेख वय ३१ वर्षे रा. मलठण ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहे.