शिक्रापुरातील देवीचे चोरी गेलेले दागिने ग्रामस्थांना सुपूर्त
लक्ष्मीपूजन पूर्वी मुखवटा व साहित्य मिळाल्याने नागरिक आनंदी
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील केवटेमळा येथे असलेल्या वडजाई माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुखवटा, सोन्याचे मणीमंगळसूत्र व आदी साहित्य जुलै २०२४ मध्ये चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडलेली असताना सदर गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांकडून लक्ष्मीपूजन पूर्वी देवीचा मुखवटा व दागिने मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील केवटेमळा परिसरातील ग्रामस्थांनी येथील वडजाई माता मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करत देवीचा चांदीचा मुखवटा बसवलेला होता, ६ जुलै २०२४ रोजी सकाळच्या सुमारास देवीचा चांदीचा मुखवटा, सोन्याचे मणीमंगळसूत्र, पितळी समई व माईक सिस्टीम चोरीला गेल्याचे समोर आले, याबाबत शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल असताना पारगाव पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने सदर चोरी केलायचे निष्पन्न झालेले असताना शिक्रापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने सदर आरोपीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला त्यांनतर चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्याची कायदेशीर पूर्तता पूर्ण करत नुकतेच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे यांच्या हस्ते वडजाई माता देवस्थान संस्थानचे दत्तात्रय चव्हाण, तुषार चव्हाण, समीर केवटे, ऋषिकेश केवटे, अक्षय केवटे यांच्याकडे देवीचा मुकुट, दागिने, समई व आदी साहित्य सुपुर्य करण्यात आले, दरम्यान लक्ष्मीपूजन पूर्वी देवीचा मुखवटा व दागिने मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे मंदिर चोरीतील मुखवटा व दागिने ग्रामस्थांना सुपूर्त करताना पोलीस अधिकारी.