करंदी (ता. शिरुर) येथे एका इसमाने शेतकऱ्याला शेतातील ऊस तोडणी करुन देतो, असे म्हणून शेतकऱ्याकडून वेळोवेळी पाच लाख पन्नास हजार रुपये घेऊन सदर शेतकऱ्याची दुचाकी वापरण्यास घेऊन फसवणूक करुन पोबारा केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी संभाजी बाळू गालफाडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
करंदी येथील अमोल ढोकले यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केलेली असताना, सदर ऊस तोडणी करण्यासाठी संभाजी याने मी कामगार लावून ऊस तोड करुन देतो, असे म्हणून शेतकऱ्याकडून वेळोवेळी पाच लाख पन्नास हजार रुपये तसेच वापरासाठी दुचाकी घेतली. त्यानंतर संभाजी त्यांच्या कुटुंबियांसह फरार झाल्याचे आढळून आले. अमोल भाऊसाहेब ढोकले (३१, रा. करंदी, ता. शिरुर) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.