पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, पाहा प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी

9 Star News
0
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, पाहा प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी
शिरूर प्रतिनिधी 
           पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील तब्बल 259 उमेदवारांना स्वतःची अनामत रक्कम वाचविता आली नाही. तर जिल्ह्यातील फक्त 44 उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली आहे.
यात 21 उमेदवार नवनिर्वाचित आमदार असून त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी 21 उमेदवार असे फक्त 44 जणांचे डिपॉझिट वाचले आहे.

उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश मते म्हणजेच 16.33 टक्के किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाते. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक असते. विधानसभेसाठी खुला प्रवर्गासाठी 10 हजार तर आरक्षित वर्गासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम ठेवली जाते.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 24 उमेदवार रिंगणात होते. त्यातील 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. 85.47 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेषत: गाजावाजा करत बंडखोरी करणार्‍या उमेदवाराला अपेक्षित मते मिळाली नसल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मतदासंघ आणि अनामत रक्कम जप्त उमेदवारांची संख्या
जुन्नर – 8, आंबेगाव – 9, खेड आळंदी – 11, शिरूर – 9, दौंड – 12, इंदापूर – 22, बारामती – 21, पुरंदर – 13, भोर – 4, मावळ – 4, चिंचवड – 19, पिंपरी – 13, भोसरी – 9, वडगाव शेरी – 14, शिवाजीनगर – 11, कोथरूड – 10, खडकवासला – 12, पर्वती – 13, हडपसर – 17, पुणे कॅन्टोन्मेंट – 18, कसबा पेठ – 10

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!