१९८ शिरूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी दिली असून, काल शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी ६८.९२% मतदान झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जवळपास ७३ हजार लाडक्या बहिणींनी मतदानाकडे पाठ फिरवली तर ७१ हजार ८५४ भावांनीही मतदानाला ठेंगा दाखवला आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये २ लाख ४२ हजार २३२ महिला मतदार होत्या त्यापैकी १ लाख ५१ हजार २६९ महिला मतदारांनी मतदान केल्याने ७२ हजार ९६३ लाडक्या बहिणीने मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे.
ही मतमोजणी एकूण २४ टेबलवर २० फेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती त्यांनी देऊन 6 टेबलवर पोस्टल मतदानाची मोजणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
यासाठी २५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असली ती त्यांनी सांगितले आहे.
मतमोजणीसाठी उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांनी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान आपापले ओळखपत्र घेऊन हजर राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
१९८ विधानसभा मतदारसंघ मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे आहे ६८.९२टक्के, ३ लाख २१ हजार १८० एकूण मतदान झाले असून त्यामध्ये
पुरूष मतदार १ लाख ६९ हजार ९०३, महिला मतदार १ लाख ५१ हजार २६९ ,इतर ८ मतदार आहेत.
शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी ६८.९२% मतदान झाले
.-----------------------------------------------------------
198 विधानसभा मतदारसंघ मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे आहे
1) male मतदार 169903
2) female मतदार151269
3)इतर 8
Total 321180
68.92%