198 शिरूर विधानसभा मतदार संघाच्या मतदान मोजणी करता पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, एक पोलीस उपविभागीय अधिकारी व पाच पोलीस निरीक्षक मतमोजणी दरम्यान या परिसरात लक्ष ठेवणार असल्याचे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे.
उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी होणार आहे.
शिरूर विधानसभेची निवडणूक मोठी चुरशीची झाली असून या भागात कायदा सुव्यवस्था व कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शिरूर रांजणगाव शिक्रापूर व हवेली पोलीस सतर्क झाले आहे.
मतमोजणी दरम्यान पोलिसांच्या वतीने या भागात एक उपविभागीय पोलिस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, 16 पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक, 151 पोलीस कर्मचारी, आर आय बी हरियाणाची एक तुकडी, सीआरपीएफ जवानांची एक तुकडी, एस आर पी जवानांची एक तुकडी असे बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.