निर्वी (ता. शिरूर) येथे न्हावरा बाजूकडून काष्टीकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने दुचाकीवरील तिघांना मंगळवारी (ता.५) दुपारी सव्वा तीन वाजता उडविले. या अपघातात दुचाकीस्वार
या अपघातात माणिक दशरथ पवार (वय ६०, रा. पवारवस्ती निर्वी ता. शिरूर) यांचा जागीच मृत्यू झाला तर आयुष गोपाल पवार(वय ६) व अन्विषा गोपाल पवार (वय४) हे बहीण-भाऊ अपघातात गंभीर
जखमी झाले.
याप्रकरणी गणेश बबन पवार (रा. पवारवस्ती निर्वी ता. शिरूर)यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश पवार हे निर्वी येथे कुटुंबासह राहतात. त्यांचे चुलते माणिक पवार हे निर्वीच्या हद्दीतील न्हावरा-काष्टी रोडवर धनाजी पवार यांच्या शेताजवळून दुचाकीवरून आपल्या नातवंडासह जात होते. यावेळी न्हावरा बाजूकडून काष्टी बाजूकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने (एम एच १२ एच. व्ही ३२५९) इलेक्ट्रिक दुचाकीला (एम.एच १२ टी. एफ ९७०६) पाठीमागून जोरात धडक दिली. यामुळे माणिक यांचा जागीच मृत्यू झाला तसेच त्यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची नातवंडे आयुष व अन्विषा यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी माणिक पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन अज्ञात मोटारचालक अपघाताची खबर न देता निघून गेला असून, या बाबा ची नोट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.