शिरूर शहरांतील नोकरदाराला आरबीआयच्या नावाने ८४ लाख ३४ हजाराचा गंडा

9 Star News
0
शिरूर येथील नोकरदाराला आरबीआयच्या नावाने ८४ लाख ३४ हजाराचा गंडा 
शिरूर प्रतिनिधी 
           शिरूर येथील नोकरदाराला वेगवेगळी कारणे देऊन हे बँक अकाउंट आरबीआय अकाउंट अॅड होत असुन तुमचे अकाउंटचे सर्व पैसे ट्रान्सफर करून व्हेरीफिकेशन झाल्यानंतर परत तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला जमा होतील असे सांगून तब्बल एकुण ८४ लाख ३४ हजाराला गंडा घालण्यात आला आहे.
      शिरूर येथील यांच्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्याने वेगवेगळी कारणे देऊन वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेण्यात आले आहे. आय.डी.बी.आय बँकेवरून. आय या बँक अॅप मध्ये २० लाख AMAN KUMAR या आय.डी. वर ट्रान्सफर केले. त्यानंतर फायनल स्टेप ऑफ व्हिरेफिकेशन या नावने MANPURIA AGRO P या आय. डी. वर ११ लाख ७० हजार ट्रान्सफर केले. व मला सांगितले डी.सी.पी. साहेब यांनी सांगितले आहे की, म्युचल व शेअर्स मध्ये पैसे असल्याने तुमचे व्हिरीफिकेशन पूर्ण होत नाही.

त्यांनतर मला म्युचल फंड व शेअर्स मार्केटचे शेअर्स विकण्यास सांगितले म्युच्युअल फंड मधील पैसे काढले व शेअर्स मार्केटचे शेअर्स विकुन ३९ लाख ८४ हजार ऐवढे आय. सी. आय सी.आय बँकेत घेतले व त्यानंतर अपेक्षा हॉस्पिटल या आय.डी. वर २० लाख रुपये, तसेच LLTAJ Rali या आय. डी. वर ६ लाख ८४ हजार, तसेच MAHENDRA BISHNO या अंकाउंटवर १० लाख रुपये, DHIRENDRA/YESB0000263 या आय.डी. वर ३ लाख ट्रान्सफर करून घेतले.

त्यांनतर त्यांनी सांगितले की, तुमचे आज शेवटचे व्हिरीफिकेशन आहे. पर्सनल लोन काढावे लागेल असे सांगितले व तुम्ही पर्सनल लोनकरीता अॅप्लीकेशन करा असे सांगितल्याने ऑनलाईन. नंतर पर्सनल लोन आय.सी. आय बँकेने लोन १२ लाख मंजुर केले व PANGYA digit या आयडीवर ११ लाख ८० हजार ट्रान्सफर करुन घेतले तसेच pandya digit या आयडीवर १ लाख रुपये असे वेगवेगळ्या अकाउंट वरुन तब्बल 84 लाख 34 हजार रुपये पाठविण्यास सांगुन ऑनलाईन फसवणुक करण्यात आली, अशी फिर्याद  पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!