इनामगाव (ता.शिरूर) येथे शेतकऱ्यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला असून यामुळे इनामगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिरूर तालुक्यातील पूर्व भागात बिबट्यांचा हैदोस सुरूच आहे याकडे मात्र वन विभागाने गंभीरतेने घेऊन यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची गरज असल्याचे मागणी शेतकरी नागरिकांमधून होत आहे.
ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
इनामगाव येथील वाळुंजपट येथे बुधवारी दिनांक 27/11/2024 च्या रात्री अकराच्या दरम्यान बिबट्याने विठ्ठल सिताराम उंडे यांच्या दारात बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केला तसेच शेजारी राहणारे रामदास सीताराम उंडे यांच्या कुत्र्याला घेऊन बिबट्या पसार झाला . यामुळे या परिसरात घबराट पसरली असून, आता नागरिक शेतकरी शेतात जायला सुद्धा भिऊ लागली आहेत. त्यामुळे शेती कामावर याचा परिणाम होऊ लागला आहे. शेतामधी गुरे चारण्यासाठी गुराखी भिऊ लागली आहे.
तरी सर्वांनी काळजी घ्यावी व इनामगाव परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याची गंभीर दखल वन विभागाने घ्यावी.
इनामगाव परिसरातील वाळुंजपट, नलगेवस्ती, घाडगेमळा, दर्यापट येथे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असून हा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
,