१९८ शिरूर विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज - संगीता राजापूरकर

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
      १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली असून दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी ४५७ मतदान केंद्रावर मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाच्या वतीने वोटर हेल्प डेस्क, आरोग्य सुविधा, पाळणाघर, आरामाची व्यवस्था, व मतदारांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी सर्व तयारी केली असल्याची माहिती शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे 
            दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार कालावधी संपला असून यानंतर कोणी प्रचार केला फ्लेक्स बॅनर लावले तर त्याच्यावर कारवाई होणार आहे. 
            शिरूर हवेली तालुक्यातील ४५७ मतदान केंद्रावर दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये मतदारांनी मतदान करावे असे आवाहन राजापूरकर यांनी केले आहे. 
        या मतदानासाठी एकूण २०१८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्राध्यक्ष ५०६, मतदान अधिकारी एक, दोन ,तीन ,११२७, शिपाई ४५७, व २०६ राखीव कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे.
            शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ४५७ मतदान केंद्रापैकी शिरूर तालुक्यामध्ये २१३ मतदान केंद्रे व हवेली तालुक्यामध्ये २४४ मतदान केंद्र आहे. 
          शिरूर विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या ४ लाख ६६ हजार ४२ एवढी आहे. त्यापैकी २ लाख ४१ हजार ७८७ पुरुष मतदार तर २ लाख २४ हजार २३२ महिला मतदार व इतर २३ मतदार आहेत. 
        यापैकी शिरूर तालुक्यात २ लाख १३ हजार ४०३ मतदार असून त्यापैकी १ लाख ८ हजार ७७ पुरुष मतदार तर १ लाख ५ हजार ३१६ महिला मतदार व १० इतर मतदार आहेत .
        हवेली तालुक्यात २ लाख ५२ हजार ६४१ मतदार असून त्यापैकी १ लाख ३३ हजार ७१० पुरुष मतदार तर १ लाख १८ हजार ९१६ महिला मतदार व १३ इतर मतदार आहेत. 
             या मतदारांपैकी ४०२ सेवा मतदार , ६३० दीव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी १९७ व्हीलचेअर ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदार संघामध्ये ८५ वर्षाचे वरील ३ हजार १६२ मतदार असून त्यांच्या मागणीप्रमाणे होम वोटिंग वाहन व्यवस्था स्वयंसेवक इत्यादी सुविधा पुरविण्यात आले आहे. 
              मतदान केंद्राबाहेर वोटर हेल्प डेस्क सुविधा करण्यात आली आहे. करणे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय ठिकाणी कंट्रोल रूम तयार केला आहे. त्याचा नंबर ०२१३८/२९९१४७ असून या ठिकाणी बी एल ओ ची नेमणूक केली आहे.
   मतदार संघासाठी एकूण 1590 ईव्हीएम मशीन प्राप्त झाले असून त्यामध्ये 548 बॅलेट युनिट, 548 कंट्रोल युनिट व 594 वी वी प्राप्त झाले आहेत त्याची माहिती उमेदवार यांना देण्यात आलेली आहे. तालुक्यात एकूण 1575 मतदारांना पोस्टल बॅलेट देण्यात आले आहे. उद्या सकाळपासून मतदान केंद्रावर कर्मचारी जाणारा असून त्यांच्यासाठी 72 एसटी बस, ९ मिनी बस,९ जीप असे एकूण ९० वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
          मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रचार करण्यात बंदी करण्यात आली आहे तर पोलिंग बूथ 200 मीटर अंतर्वर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लावण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली असून हे सेवांचे 18 वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचेही राजापुरकर यांनी सांगितले.
           मतदान केंद्र ठिकाणी अभयांगत कक्ष माता व लहान मुलांसाठी पाळणा घराची निर्मिती केली असून सदर ठिकाणी आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
       
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!