१९८ शिरूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांचा ७४ हजार ५५० हजार मतांनी पराभव करून शिरूर हवेलीच्या गडावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली असल्याचे दिसून आले आहे.
शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या नावाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी करून आमदारकीची सर्टिफिकेट त्यांना देण्यात आले.
आमदार निवडीचे सर्टिफिकेटही निवडणूक अधिकारी संगीता राजापूरकर यांनी त्यांना दिले आहे.
विजयानंतर शिरूर शहर वाघोली या गावांमध्ये व निवडणूक मतमोजणीच्या केंद्राबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष , गुलालाची उधळण तर फटाकेचे आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची विकास कामे उत्तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांची उज्जैन यात्रा, गुलबर्गा यात्रा, लाडकी बहिणींनी दिलेली साथ, व निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी झालेले योग्य नियोजन तर शिरूर तालुक्यात कामधेनू असलेली घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा या निवडणुकीत बनला होता त्याचा फटका यामुळे माऊली कटके यांनी एकतर्फी विजय मिळवता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माऊली कटके यांची उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शिरूर येथे झालेली भव्य सभा या सभेची चर्चा व हवा संपूर्ण शिरूर हवेली मध्ये झाली व ती कायम राहिली.
यावर ही निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजत असताना लाडक्या बहिणीने ही यामध्ये लक्ष घातले असल्याचे दिसून आले आहे.
शिरूर तालुक्यातून अशोक पवार व ज्ञानेश्वर माऊली कटके या दोघांमध्ये माऊली कटके यांनी ३० हजारहून जास्त मतांची आघाडी घेतली हीच आघाडी अशोक पवार यांच्या परभावर शिक्कामोर्तब करून गेली.
एकूण पोस्टल मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार यांना 680 मते तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना 639 मध्ये पडली यामध्ये मात्र अशोक पवार यांनी आघाडी घेतली.
तर या निवडणुकीमध्ये पोस्टल मतदानामध्ये झालेल्या मतदानात सरकारी कर्मचारी यांनीही नऊ नोटा मतदान करून दोन्ही प्रमुख उमेदवार व इतर नऊ उमेदवारांना नाकारून नोटाकडे आपले मत दिले आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना १लाख ९२ हजार २८१ एवढी मते मिळाली तर त्यांची प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार अशोक पवार यांना १ लाख १७ हजार ३१ एवढी मते मिळाली. तर तीन नंबर सैनिक समाज पक्षाची तुकाराम डफळ ३१५२ मते मत मिळाली असून,२१५७ नोटाला एवढी मते मिळाली आहे. त्यामुळे माऊली कटके यांनी आमदार अशोक पवार यांचा एवढ्या मजा आणि पराभव करून त्यांना चारी मुंड्या चित केले आहे.
निवडणूक मतमोजणी दरम्यान मतमोजणी प्रतिनिधी यांनी दहा वेळा मतमोजणी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे मतमोजणी विलंब झाला.
शिरूर हवेली तालुक्यातील आमदार अशोक पवार यांना होणारा राजकीय नेत्यांचा मोठा विरोध व जवळचे असणारे अनेक नेते विरोधात गेल्याने व घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद याचा झालेला तोटा या सर्वांच्या चक्रव्यूवाहात अडकून आमदाराचे पवार यांचा गेम होऊन त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
अतिशय अटीतटीची उभा पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात काटे की टक्कर अशी झाली. निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर तर्क वितर्क व पैजा यांनी शिरूर हवेलीचे वातावरण ढवळून निघाले होते.
आज सकाळी आठ वाजता रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये या मतमोजणी सुरुवात झाली.
24 टेबलावर वीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी सुरू झाली पहिल्या फेरी पासून ते शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत माऊली कटके यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेतली ती शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवली. एकही अशी फेरी नाही की त्यामध्ये आमदार अशोक पवार यांना आघाडी भेटली त्यामुळे विजय हा सुकर होत गेला आणि एकतर्फी झाला.
या विजयाबद्दल बोलताना नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके म्हणाले माझा विजय सर्वसामान्य माय माऊली मतदार राजा व लाडक्या बहिणींचा आहे. हा विजय माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांना
समर्पित करतो असे सांगितले .
शिरूर रांजणगाव शिक्रापूर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिरूर हवेली त विजयी उमेदवार व इतर उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे
विजयी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ( राष्ट्रवादी काँग्रेस) - १ लाख ९२ हजार २८१
पराभूत अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्ष - १ लाख १७ हजार ७३१
विशाल सोनवणे - १६०३
चंद्रसेन घाडगे -११३९
तुकाराम डफळ - ३१५२
विनोद चांदगुडे - २४६
अशोक ग.पवार - २२०
अशोक रा पवार - ३७६
दत्तात्रय काळभोर - ११४१
नाथा पाचर्णे - ६४४
राजेंद्र कांचन - ३८७
नोटा - २१५७