दीपावलीच्या सणाची सुरुवात पहिला दिवा छत्रपती शिवरायां चरणी या उपक्रमांतर्गत सह्याद्री प्रतिष्ठान व शिरूर शहरातील शिवप्रेमी तरुणांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या स्मारकावर शेकडो दीप प्रज्ज्वलित करून शिवदीपोत्सव साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
यानंतर एकाचवेळी पुतळा परिसरात शेकडो दीपप्रज्ज्वलित केले.
यावेळी नगरसेविका रोहिणी बनकर, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, शिरूर बार असोसिएशनचे अॅड. राजेंद्र शितोळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, उषा चव्हाण, युवा नेते योगेश पवार, संतोष सांबारे, अॅड. संजय ढमढेरे, राहिल शेख, प्रियांका धोत्रे, भूषण खैरे, निशिकांत काळे उपस्थित होते.
हर्ष, उल्हास, आनंद अन् मांगल्याचा असा दिव्यांचा सण सुरू झाला असून, नागरीकांनी आनंदात सण साजरे करावे असे आव्हान शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले