शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रामलिंग परीसरात अवैध्यरीत्या तीस हजार आठशे रुपयांचा गुटखा वाहतुक करताना सचिन अंकुश कु-हाडे हा इसम गाडीसह मिळून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील हद्दीत रामलींग येथील शिक्षक कॉलनी ता. शिरूर येथे इसम सचिन अंकुश कु-हाडे रा. पाबळफाटा, शिरूर हा विना परवाना प्रतिबंधित असा आगामडी कंपनीचा गुटखा, एम कंपनीची तंबाखु, विमल कंपनीचा गुटखा व व्ही १ कंपनीची तंबाखू असा माल वाहतुक करत असल्याची बातमी मिळाल्याने रामलिंग येथील शिक्षक कॉलनी येथे पो.हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे व पो.हवा. नितिन सुद्रिक यांनी छापा कारवाई करून एकुण ३०,८००/- रु. किमतीचा प्रतिबंधित असा आरएमडी कंपनीचा गुटखा, एम कंपनीची तंबाखु, विमल कंपनीचा गुटखा व व्ही १ कंपनीची तंबाखु असा गुटखा त्याच्या ताब्यातील ४,००,०००/- रू. किंमतीची टोयाटो कंपनीचे इटीऑस कार नं. एम.एच ०४ एफ.आर १०७१ मध्ये विनापरवाना वाहतुक करीत असताना मिळुन आला म्हणून आरोपी सचिन अकुश कु-हाडे ( वय ३० वर्षे ) रा. पाबळफाटा, शिरूर याच्याविरुध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षकसंदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे, पो.हवा. नितिन सुद्रिक यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि .हनुमंत गिरी हे करीत आहेत.