विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस जवानांकडून सशस्त्र पथक संचालन - संदेश केंजळे

9 Star News
0
शिरूर, प्रतिनीधी 
       महाराष्ट्र विधानसभा निवडणुक दरम्यान कायदा सुव्यवस्था राहावी व निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस व सीमा सुरक्षा दलाचे जवानांचे शिरूर शहरात सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. 
         पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाची अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्यांचे कडील ४ पोलीस अधिकारी व ३० पोलीस अंमलदार तसेच सीमा सुरक्षा दलाकडील ५ अधिकारी व ७० जवान असे सशस्त्र संचलन शिरूर पोलीस स्टेशन पासुन शिरूर शहरामधील बी.जे. कॉर्नर, रामआळी, पाच कंदील चौक, डंबेनाला, सिध्दार्थनगर, आण्णाभाऊ साठे चौक, शिरूर बस स्टैंड, इंदिरा गांधी पुतळा,बी.जे. कॉर्नर या भागात केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होणारे प्रचार, मतदान, मतमोजणी इत्यादी या प्रक्रिये करिता पोलीस प्रशासन सज्ज असुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरिता सदरचे पथ संचलन करण्यात आलेले आहे.
        संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक, शिरूर.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!