शिरूर शहर तालुका काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार.. आमिष आम्ही नाही तुम्हीच घेतली तुमची करणार पोलखोल -अमजद पठाण

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
 काँग्रेस पक्ष आघाडीतील प्रमुख असून पक्षाची जी भूमिका ती आम्हा कार्यकर्त्यांची आहे शिरूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार अशोक पवार यांच्या पाठीशी शिरूर शहर तालुका काँग्रेस सर्व कार्यकर्ते उभे राहणार आहे व त्यांचा प्रचारही करणार आहे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस युवकचे शहराध्यक्ष अमजद पठाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
        तळेगाव ढमढेरेच्या बैठकीला केवळ विधानसभेच्या प्रचारा कसा करायचा याच्यासाठी बैठक बोलावली होती परंतु त्या ठिकाणी महेश बापू यांनी वेगळी भूमिका घेतली जे पक्षाचे कार्यकर्ते आघाडी धर्म पाळून महाविकास आघाडीचे काम करत आहे त्यांच्यावर टीका करताना त्यांनी या लोकांना आमिष घेतले असल्याचे बोलले ते साफ चुकीचे आहे. आम्ही केवळ आघाडी धर्म,पक्ष धर्म व पक्षनिष्ठा म्हणून काम करत आहोत आणि आपण कोणते आणि कधी आमिष घेतले याची पोलखोल आम्ही लवकरच करू असा इशाराही पठाण यांनी दिला. 
         आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या आदेशाने शिरूर तालुका काँग्रेस कमिटीने ही पत्रकार परिषद घेतले ते त्यांनी सांगितले.
 माजी नगरसेविका संगीता मल्लाव यांच्या घरी ही पत्रकार परिषद घेतली .
    यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास थोरात ,महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष प्रियंका बंडगर महाराष्ट्र प्रदेश विभागीय अध्यक्ष विजय डिंबर शिरूर शहर युवक काँग्रेस 
अध्यक्ष अमजद भाई पठाण, शिरूर शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेविका संगीता मल्लाव, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजीम सय्यद ,पुणे जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष शोभाताई वाकचौरे, तालुका कार्याध्यक्ष पोपट वाकचौरे .पुणे जिल्हा फिशरमेन काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू मल्लाव, अशोक भुजबळ,शिरूर शहर युवती अध्यक्ष ज्योती हांडे ,ललित गुगळे, सरचिटणीस सोहेल शेख 
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. आणि एक दिलाने एक मताने महाविकास आघाडीचा काम करून अशोक बापू पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा चंग या सगळ्यांनी बांधला.
       काँग्रेस आय पक्ष महाआघाडीतील एक प्रमुख पक्ष आहे पक्षश्रेष्ठी व पक्षाने घेतलेली भूमिका ही  कार्यकर्त्यांची भूमिका असणार आहे
 त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा आम्हीं प्रचार करणार असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांनी फोनवरून सांगीतले.
        काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश विभागीय अध्यक्ष विजय डिंबर म्हणाले काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्रात काम करत आहे. तळेगाव ढमढेरे येथील बैठक व बैठकीबाबत कुठल्याही कार्यकर्त्याला नेत्याला काही माहिती नव्हते. तेथे गेल्यावर काही स्वार्थी लोकांच वेगळंच रूप दिसले ते आम्हाला मान्य नसून, महाविकास आघाडीच्या धर्म पळून महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
         यावेळी बोलताना तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष प्रियांका बंडगर म्हणाल्या महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार कसा व कोणत्या प्रकारे करायचा यासाठी बैठक बोलावली होती. पण तेथे काही लोकांची वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसून आले . ते आम्हाला मान्य नाही . पक्षाने जी भूमिका घेतली त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. पक्ष व महाविकासआघाडी धर्म पाळून महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!