भाजपाचा शिरूर विधानसभेत होणारा मेळावा निर्धार करणारा होईल का ? भाजपाला निराधार करणारा होईल याकडे शिरूर हवेलीचे लक्ष

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर विधानसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पक्षाला ही जागा सुटली नसल्याने आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या निर्धार मेळाव्यातून भाजपा दंड थोपटणार का ? पाण्यात बसणार याकडे संपूर्ण शिरूर हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे.
        भारतीय जनता पार्टीचा निर्धार मेळावा होणार का ? भाजपा निराधार होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
          निर्धार झाला नाही तर भाजप आणि कंद या दोघेही शिरूर हवेली तुन निराधार होती हे मात्र खरे!
          हा निर्धार मेळावा पेरणे फाटा येथे उद्या दिनांक 27 ऑक्टोबर सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. 
          शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठे वर्चस्व आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक कार्यकर्ते या पक्षाचे पहावयास मिळत आहे. 
       त्यात भारतीय जनता पार्टी पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे इच्छुक होते. त्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश झाला आणि भारतीय जनता पक्षाला शिरूर विधानसभेतच नव्हे तर संपूर्ण राज्यात तडजोड करावी लागली आहे.
. शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रदीप कंद यांना उमेदवारी जाहीर होणार हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोलले जात होते. तसा तगडा उमेदवार ही कंद होते. परंतु तर तडजोडीच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला ही जागा सोडावी लागली आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
           या सर्व वाटाघाटी मध्ये मात्र भारतीय जनता पक्ष शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये निराधार झाला असे म्हणावं लागेल. जर उमेदवारी नसेल तर 
 या पक्षाला आधार मिळणे पुढील काळात खूप कठीण होणार आहे. जर आता उमेदवारी मिळणार नसेल तर हा तालुका भाजप असूनही कार्यकर्ते दिशाहीन होईल.
            2019 च्या निवडणुकीमध्ये उद्या होणाऱ्या निर्धार मेळाव्याची निमंत्रक प्रदीप कंद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न भेटल्यामुळे त्यांनी नाराज होऊन भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला होता. तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रवेश झाला होता त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचर्णे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर तीन वर्षात आमदार पाचर्णे राहीले नाही.
              त्यानंतर प्रदीप कंद यांच्याकडे भारतीय जनता पार्टीची सूत्रे आली होती आणि त्यांनी या मतदार संघामध्ये कामही चालू केले होते. परंतु 2024 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी पुन्हा भेटली नाही. कारण शिरूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे गेली आहे. 
             राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला गळला लावून आपल्याकडे खेचून आणून पुन्हा एकदा लोकसभेसारखा आयात उमेदवार दिला आहे. 
               भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी जीव तोडून लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार केला होता ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला त्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला दिसला नव्हता. 
               कारण भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुती महत्त्वाची होती त्यामुळे व पुढे सहा महिन्यांनी येणारी विधानसभा निवडणूक महत्त्वाची होती कारण विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीला शिरूर विधानसभेची जागा मिळेल व तेथे आपला उमेदवार प्रदीप कंद यांच्या नावाने उभा राहील असा आशावाद भाजपच्या कार्यकर्त्यांना होता. 
              परंतु विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली कारण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे गेली . त्यामुळे शिरूर हवेलीतील भाजपातील असंख्य कार्यकर्ते काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण शिरूर हवेली तालुक्याची लक्ष लागली आहे त्यात उद्या 27 ऑक्टोबरला पेरणे फाटा येथे प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
               या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतील याकडे शिरूर हवेलीची लक्ष लागून राहिले असून हा मेळावा निर्धार करणारा होईल का ? भारतीय जनता पार्टी पक्ष शिरूर हवेली तालुक्यात निराधार होईल हे उद्या समजेल.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!