रावडेवाडी ता. शिरुर येथे दुचाकीला अज्ञात वाहानाची धडक बसून झालेल्या अपघातात नोकरीच्या मुलाखतीसाठी निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यातील मृत तरुण पराग शुगर मिल्स साखर कारखान्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी दुचाकीवरून जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या अपघातात शुभम प्रभाकर जंजाळ (वय २५ वर्षे रा. रामपूर वाडी पोस्ट उंबरखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) याचा मृत्यू झाला तर उमेश विष्णू शेळके (वय २५ वर्षे रा. रामपूर वाडी पोस्ट उंबरखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) हा गंभीर जखमी झाला,
याबाबत उमेश विष्णू शेळके (वय २५ वर्षे रा. रामपूर वाडी पोस्ट उंबरखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर (याने शिरुर पोलिसांत दिलेल्या फिर्यादी
शिरूर पोलीस स्टेशन नेते अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलठण ता. शिरुर नजीक रावडेवाडी येथे पराग शुगर मिल्स साखर कारखान्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी शुभम जंजाळ व उमेश शेळके हे दोघे आलेले असताना मलठण येथे मलठण काढून शिरुर कडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाची दोघांच्या दुचाकीला धडक बसली दरम्यान दोघे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले, यावेळी झालेल्या अपघातात शुभम प्रभाकर जंजाळ याचा मृत्यू झाला तर उमेश विष्णू शेळके हा गंभीर जखमी झाला आहे.
, याबाबत उमेश विष्णू शेळके वय २५ वर्षे रा. रामपूर वाडी पोस्ट उंबरखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर याने शिरुर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शिरुर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देविदास खेडकर हे करत आहे