शिरूर प्रतिनीधी
शिरूर तालुक्यातील कारेगाव करडे रस्त्यावरील भूतबंगला येथे अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार तरुणाला रांजणगाव पोलीस पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत कार्टून असा ३५ हजार दोनशे रुपयांचा ऐवज केला आहे.
सुशांत रमेश कराळे (वय २७ वर्षे, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की कारेगाव करडे रोड लगतच्या भूत बंगल्याजवळ चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण पिस्टल घेऊन येणार असल्याचे समजले पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ पोलीस हवालदार विलास आंबेकर यांना सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले माहितीच्या आधारे भूत बंगल्याजवळ पोलीस पथकाने सापळा लावला असता दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान संशयित चॉकलेटी रंगाचे शर्ट घातलेला तरुण तिथे येताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत काडतूस असा पस्तीस हजार २०० रुपयाचा ऐवज जप्त आहे त्याचे नाव सुशांत कराळे असून तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून यापूर्वी खुनाचा व आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल असून त्याच्या विरोधात तडीपारचाही प्रस्ताव प्रलंबित असून लवकर त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक फौजदार अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर यांनी केली .आरोपीने सदरचे पिस्टल कोणाकडुन आणले आहे व त्याचा पिस्टल बागळण्याचा नेमका काय उद्देश आहे याबाबत तपास सुरु असून, गुन्हयांचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अभिमान कोळेकर करीत आहे.
सुशांत कराळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून यापूर्वी खुनाचा व आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल असून त्याच्या विरोधात तडीपारचाही प्रस्ताव प्रलंबित असून लवकर त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.