शिरूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी समता पक्ष व अपक्ष एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
 १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी समता पक्ष व एक अपक्ष असे दोघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर व सहाय्यक निवडणुक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
      तर आजही दहा उमेदवारांनी अकरा उमेदवारी अर्ज नेले असले ते त्यांनी सांगितले. 
           आज पर्यंत एकूण २० उमेदवारांनी ६६ उमेदवारी अर्ज अर्ज नेले आहे.
        आज समता पक्षाच्या भाऊसाहेब बाळासाहेब जाधव तर अपक्ष प्रकाश सुखदेव जमदाडे यांनी या दोघांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. पंढरीनाथ मल्हारी गोरडे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
      तर आज पासून उमेदवारी अर्ज सहा दिवस म्हणजे 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना भरता येणार आहे.
          शिरूर तहसील कार्यालय येथे विविध दाखले परवानगी यासाठी एक खिडकी सुविधा केली असून त्यामधूनच आपल्या सभा सभा लाऊड स्पीकर मंडप व इतर परवानगी घ्यावे असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!