शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे घोडे अजूनही अडलेले असून आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वतीने शिरूर चा उमेदवार जाहीर केला नसल्यानें या उमेदवारी बाबत सस्पेन्स अजुनही बाकी असला तरी शिरूरकरांना 2009 विधानसभेच्या आठवणी आजूनही जाग्या आहेत. माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे सारखा माऊली कटके आबांचा गेम होऊ नये अशीही चर्चा आता शिरूर विधानसभेमध्ये रंगत आहे.
शिरूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहे तर उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
तर शिरूर विधानसभेची गणिते बदली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली कटके यांना आपल्या पक्षात घेतले आहे. परंतु त्यांची उमेदवारी किंवा त्यांना एबी फॉर्म अद्याप त्यांनी दिला नाही.
त्यात शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी या पक्षाची ताकद आहे. दोन वेळेस आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या शिरूर विधानसभेची नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले आहे.
त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद या मतदारसंघात मोठी आहे तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हेही या मतदारसंघात मधून विधानसभेची निवडणूक लढवण्यात तयार आहेत. त्यात माऊली कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलेला प्रवेश यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाती का काय असे चिन्ह निर्माण झाले आहे
यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही मोठी नाराजी पसरली आहे. त्यांनी कालच वाघोली येथे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बैठक बोलत होती व त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळावी अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे ठराव या बैठकी संपन्न झाला.
त्यात भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर शिरूर विधानसभेचे उमेदवार प्रदीप दादा कंद अशी पोस्ट फिरत आहे.
त्यामुळे शिरूरकरांच्या मनात धडकी भरली आहे 2009 मध्ये शिरूर चे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी हवेली मध्येच एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्या पायाखालची दगड होण्याची सांगून त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. परंतु ऐन निवडणुकीत उमेदवारी देताना बाबुराव पाचर्णे यांचा पट्टा दादांनीच कट केला असल्याचे चर्चा होती. शेकडो गाड्या घेऊन अजित पवार यांच्या भेटीला बारामतीत आमदार बाबुराव पाचर्णे गेले होते परंतु अजित पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नव्हते हा इतिहास पाहता.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश गेलेले ज्ञानेश्वर माऊली कटके यांची आज उमेदवारी जाहीर केली नसून,शिरूरच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे 2009 ची पुनरावृत्ती होती का काय अशी चर्चा शिरूर विधानसभेतील प्रत्येक नागरिकांच्या तोंडामध्ये आहे.
जोपर्यंत शिरूर विधानसभेची जागा कोणाकडे उमेदवारी जाहीर होत नाहीं तोपर्यंत प्रदीप कंद व माऊली कटके दोन्ही गॅसवर व शिरूर तालुक्यातील जनता वॉचवर आहे हे माञ नक्की खरे!
