महाविकास आघाडीचे उमेदवार शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार उद्या दिनांक २४ ऑक्टोबर रोजी शिरूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत भरणार असून महविकास आघाडीचे उमेदवारॲड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शिरूर पाच कंदील चौक येथे सभाही होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी दिली आहे.
यावेळी दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल,खासदार निलेश लंके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष, आप पक्ष व सर्वच मित्र पक्षांचे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
उद्या दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता शिरूर येथील बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य रॅली व शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज भरणार आहे.
यावेळी शिरूर तालुक्यातील व हवेली तालुक्यातील आमदार अशोक पवार व महाविकास आघाडीला मानणारे अनेक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार आहेत.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे मार्गदर्शन करणार आहेत.
