शिरसगाव काटा ता.शिरूर येथे नागनाथ सुपर मार्केट समोर गावचे माजी सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ करत तू आमच्या विरोधात तक्रार द्यायला पोलिसात जातो काय तुला संपूर्ण टाकतो असे म्हणत महिलांसह आठ जणांनी तलवार कोयता व काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण भिवा गोरे,सागर भिवा गोरे,चिव्या यल्ला गोरे ,भिवा अंनता गोरे, ताईबाई भिवा गोरे,आनंदा गोरे ,उमाबाई गोरे, म्हाळा गोरे सर्व (रा.शिरसगाव काटा, ता शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र केशव केदारी (रा.शिरसगाव काटा, ता शिरूर) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सहा शेतातील काम करून रामचंद्र केदारी हे घरी मोटारसायकल वरुन जात असताना गावातील नागनाथ सुपर मार्केटला आले असता. त्या ठिकाणी प्रविण भिवा गोरे, सागर भिवा गोरे, चिव्या चला गोरे, यांनी त्यांना अडविले व मोटारसायकलचा हॅन्डल पकडून त्यांना जातीवाचक शिविगाळ करुन तु जास्त माजलास का…? आमच्या विरोधात पोलीस चौकीला तक्रार देण्यास निघाला होता काय…? तु जर आमच्या विरोधात तक्रार दिली तर तुम्हा लोकांना गावात राहुन देणार नाही. आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणून प्रविण भिवा गोरे व चिव्या चल्ला गोरे यांनी तलवार काढून रामचंद्र केदारी याच्या दोन्ही हातावर व पायावर तलवारीने वार केले. तसेच सागर भिवा गोरे याने कोयत्याने पायावर वार केले. त्यामुळे ते खाली पडले.आरोपींनी जोराने आवाज देवून काही लोकांना बोलावले असता भिवा आनंदा गोरे, ताईबाई भिवा गोरे, आनंदा गोरे उमाबाई गोरे, म्हाळा गोरे हे त्या ठिकाणी आले व त्यांना परत काठीने हाताने लाथाबुक्यांनी रामचंद्र केदारी यांना मारहाण करुन याला आज खल्लास करुन टाकु अशी धमकी देऊन सर्व आरोपी पळून गेले. यानंतर रामचंद्र केदारी यांचा पुतण्या निशात केदारी याने दौंड येथील एका खाजगी दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी नेले आहे. फिर्यादीवरून मारहाणीचा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे करत आहेत.
