शिरूर शहरात खून करून फरार झालेल्या आरोपीस शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ठोकल्या बेड्या
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत जिजामाता गार्डन समोर तरुणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने ठोकल्या बेड्या. पोलिसांच्या या कारवाईची सर्व थरातून कौतुक होत आहे.
नागरेश बाजीराव काळे (रा. पाण्याचे टाकीजवळ शिरूर ता. शिरूर जि. पुणे) याला अटक कऱण्यात आली आहे . असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वसंत दिलीप भोसले (रा. शिरूर ता. शिरूर) याचा खून झाला होता.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १ ऑगस्ट २४ रोजी शिरूर शहरातील जिजामाता गार्डन समोर वसंत दिलीप भोसले यास त्याची सून हिला घरगुती वादातून झालेल्या मारहाणीतून अंजली काळे हिचा भाऊ नागरेश काळे, बहीण निघु काळे, व एका विधीसंघर्षित बालकाने मयतास कोयता उलटा करून बोथड बाजुकडुन छातीत, पायावर मारहाण करून त्यास डांबरी रोडवरून फरफटत नेले या त्याला गंभीर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यातील प्रमुख आरोपी नागरेश काळे तेव्हापासून फरार होता.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली
फरार आरोपी नागरेश हा चाफेकर चौक चिंचवड येथे येणार असल्याचे कळाले पोलीस अंमलदार विजय शिंदे यांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना याबाबत माहिती दिली . तर आरोपी पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक प्रमूख सहाय्यक पोलीस निरीक्षक हनमंतराव गिरी, पोलीस उपनिरिक्षक दिलिप पवार,
पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, परसराम सांगळे पोलीस अमंलदार निरज पिसाळ, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात,निखील रावडे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, सचिन भोई
हे पोलीस पथक बातमी मिळाले ठिकाणी चाफेकर चौक चिंचवड पुणे येथे पाठवून त्या ठिकाणी सापळा लावला आरोपी नागरेश तिथे येताच पोलिसांनी त्याला पकडून बेड्या ठोकल्या. आरोपी हा पकडणे मोठे आव्हान पोलिसां पुढे होते. कारण आरोपी सतत आपला ठाव ठिकाणा बदलत होता.परंतू शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व पोलीस तापास पथक यांनी मोठ्या शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या.
गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत.
