सुसंस्कारित समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा.... जयंत आंसगावकर

9 Star News
0
सुसंस्कारित समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा.... जयंत आंसगावकर
शिरूर प्रतिनीधी 
       सुसंस्कारित समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले.
        महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याची आयोजन शिरूर विद्याधाम प्रशालेच्या नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी आमदार आसगावकर बोलत होते. 
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुक्याचे माजी आमदार व म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पलांडे होते.कार्यक्रमाला मा. शिक्षक आमदार भगवानआप्पा साळुंखे,पुण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री नंदकुमार निकम शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे सचिव अरविंददादा ढमढेरे,शिक्षक नेते वि.ल.पाटील,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,सचिव मारुती कदम उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, उद्योजक सुमतीलाल दुगड, सुरेश शेळके यांनी विशेष सहकार्य केले.
       पुणे विभागाचे आमदार आसगावकर पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत समाजातील प्रत्येक घटकाबरोबर सुसंवाद साधून विकसित भारताचे स्वप्न सर्वार्थाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱा घटक म्हणजे शिक्षक.शिक्षकांच्या विविध समस्यांसंदर्भात देखील आसगावकर यांनी भाष्य केले
       .याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर म्हणाले  मी झिरो पेंडन्सी वर काम करत आहे.शिक्षकांनी जगभरातील नवनवीन शिक्षणातील बदलते प्रवाह तंत्रज्ञान आत्मसात करून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही काळाची गरज आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० समजून घेताना त्यातील बारकावे लक्षात घेऊन ते प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे डॉ.कारेकर यांनी सांगितले.
      या पुरस्कार वितरणात आदर्श संस्थाचालक श्री.म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव म्हाळुंगी माजी आमदार, अध्यक्ष सूर्यकांत तथा काकासाहेब पलांडे, शिरूर शिक्षण मंडळाचे सचिव नंदकुमार निकम  शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे सचिव अरविंददादा ढमढेरे तर विलास लक्ष्मण पाटील शिक्षक नेते यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
       जिल्ह्यातील सुमारे ५९ शिक्षकांना तर ५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष निलेश काशीद,कार्यवाह महेश शेलार,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिरूर तालुक्याचे अध्यक्ष प्रवीण आढाव व सर्व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या परिवाराने परिश्रम घेतले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सातपुते,संतोष क्षीरसागर,विकास घुले,सचिन रासकर,मच्छिंद्र खेडकर,सुधीर थोरात आदींनी तर आभार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे यांनी मानले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!