शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना म्हणतोय राजकारण्यांनो तुमच्या जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे अखेर तुम्ही माझा घेतला ना बळी.... आता मलाच माझे वाटू लागले आहे की मी कायमचा शांत होईल माझे मरण मी डोळ्यानं पाहतोय.... आता बोलण्यातही त्रान उरले नाही.... होय मी घोडगंगा साखर कारखाना बोलतोय... माझा बाजार मांडून स्वतःची पोळी भाजून घेतली ना...
घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी कोणी जीवाने आणि प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत नाही. काहीजण म्हटले कोणी दादा निधी देत नाही... तर काहीजण नुसत्या पोकळ गप्पा मारतात... ऊस उत्पादक शेतकरी आणि तालुक्यातील नागरिकांना गुमराह करण्यात काम करत आहेत. आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्या नावाचे राजकारण करून स्वतःचा फायदा पाहत आहे.
अरे ... नतद्रष्टांनो माझा बाजार मांडू नका.... माझे राजकारण्याचं खेळणं करू नका असे मी वारंवार दरडून तुम्हाला सांगत होतो.परंतु तुम्ही तर महाचोर निघाले अरे महा चोरांनो तुम्हाला या तालुक्याची जनता चांगली ओळखत आहे. ती तुम्हाला माफ करणार नाही.
अरे तुम्ही यात्रा माझे चाक सुरु करण्यासाठी काढली ना... सांगा यामुळे मी कसा सुरू होऊ शकतो कसा जिवंत होऊ शकतो सांगा सांगा... केवळ गावोगावी फिरण्याने मी चालू झालो असतो तर या अगोदर वर्ष भरा अगोदरच मी चालू झालो असतो.
केवळ मला आणि माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुमराह करून स्वतःची राजकीय पोळी तुम्हाला भाजायची होती. खरे आहे ना हे... तुम्हाला राजकीय पोळीच भाजायची होती तर आणखी अनेक राजकारण करण्याची ठिकाण आहे. माझ्या नावाचं राजकारण करून मला संपवण्याचा घाट तुम्ही घातला तर नाही ना? याबाबत माझ्या मनात ही शंका येत आहे. तुमच्या कृतीवर मला संशय अगोदरच होता आणि आता तो बळावत गेला आहे.
झाले तुमचे राजकारण ज्या लोकांना त्यांच्या गावातील त्यांच्या तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडला तो चालू करता आला नाही ते मला घोडगंगाला चालू करण्याचे स्वप्न कसे पाहतात मी काय वेडा आहे.
तुम्ही यशवंत च्या कार्यक्षेत्रात राहतात किती दिवसापासून तुमचा यशवंत बंद आहे. सांगाल का मला. अनेक राज्यकर्ते सत्ताधारी, विरोधक, परत विरोधक झाले आणि पुन्हा सत्ताधारी झाले पुन्हा विरोधक झाले आणि पुन्हा सत्ताधारी झाले... पण मला सुरु करण्याची हिम्मत तुम्ही दाखवली नाही तुमच्या नेत्यांनी दाखवली नाही. मी आजही मरण अवस्थेत पडलो. उद्याही मरण अवस्थेत राहील. परंतु ते तुम्ही मला यशवंतला सुरू करण्यासाठी काडीचाही प्रयत्न करू शकले नाही आणि इकडे तुम्ही घोडगंगा कसा सुरू करून देऊ शकता. थांबा थांबा कळले मला तुम्हालाही या शिरूर हवेली तर नेतृत्व आणि आमदार व्हायचंय काय? म्हणून तुम्ही फेका मारण्याची काम करताय शेतकऱ्यांना, गोरगरिबांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुतना मावशीचे प्रेम आणून स्वतःची पोळी भाजून घेत आहे.
होय मी घोडगंगा बोलतोय मलाही पुन्हा जिवंत व्हायचे... करावे असे मला वाटते... आज मी माझे मरण माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. तुम्ही या दहा दिवसांमध्ये जर राज्य शासनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे जाऊन दहा दिवस ठाण मांडले असते तर त्यांनाही थोडीशी दया आली असती आणि मला जिवंत करण्यासाठी तो प्रयत्न कदाचित यशस्वी झाला असता.... परंतु तुम्हाला हे नको आहे हे मी समजू शकलो आहे. आता माझी मरण मीच माझ्या डोळ्याने पाहतोय... जाता जाता एवढेच सांगेन राजकारण्यांनो माझा बाजार मांडू नका.... तुमचा स्वार्थ साधण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत... तेथे राजकारणाचा बाजार मांडा.... केवळ विधानसभा डोळ्यासमर ठेवून माझ्या बंद राहण्याचा बाजार मांडू नका... मी सुरू होईल हे आता कदापि शक्य नाही. कारण दोन वर्षात माझ्या आयुष्याचा खुळखुळा आणि भंगार होऊन मी क्षीण झालो आहे. माझे चाक फिरणे आता अवघड आहे. तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मणी आहात... एवढेच सांगतो जगलो वाचलो तर पुन्हा भेटू .....आमचा आता राम राम घ्यावा.... तुमचाच घोडगंगा सहकारी साखर कारखाना.