क्षेत्रभेटीमधून प्रयोगशाळेला भेट .
चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते व त्यातूनच त्यांच्या जिज्ञासू वृत्तीची वाढ होत असते . जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची समाधान कारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत .
अशाच चिमुकल्यांचे विज्ञान विषयातील कुतूहल ओळखून व वैज्ञानिक गमतीजमती त्यांना कळाव्यात म्हणून शिरुर येथील विद्याधाम प्राथमिक शाळेतील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांना विद्याधाम प्रशाला शिरूर येथील प्रयोग शाळेला भेट देण्याचा उपक्रम मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षिकांनी राबवला .
या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक वृत्ती जागृत व्हावी हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न शाळेने केला आहे. विद्याधाम सायन्स कॉलेजचे प्रा . कृष्णा फराटे यांनी रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये विविध रंग कसे तयार होतात हे दाखवताना रक्त तयार करून दाखवल्यावर विद्यार्थी आवाकच झाले .प्रा .रविंद्र मांढरे यांनी निसर्गामध्ये वेगवेगळे प्राणी असतात त्या प्राण्यांची माहिती लॅबमध्ये सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना सूक्ष्मदर्शक दाखवले. यांनी विविध प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करून मार्गदर्शन केले.
या क्षेत्रभेटीत इयत्ता चौथीच्या एकूण २६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने विविध प्रश्न विचारले .त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत झाला. मानवी सांगाड्याची रचना अनुभवली .विविध उपकरणे हाताळून पाहिली. सूक्ष्मदर्शकाची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके स्वतः करून पाहिली.
विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे यांनी प्रयोगशाळेला भेट देण्यासाठी बहुमोल सहकार्य केले . तसेच विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.
इयत्ता ४थीच्या वर्गशिक्षिका रोहिणी औटी, भारती दाभाडे,सोनाली गोरे, अर्चना घोगरे , सोनाली घेगडे, जयश्री पाचरणे,साधना इंगळे या सर्व शिक्षिकांनी या क्षेत्रभेटीचे उत्कृष्ट आयोजन केले.
चौकट :
सध्याची पिढी अत्यंत चाणाक्ष व हुशार असून शालेय विद्यार्थ्यांना बाल वयातच विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा व हे असेच का ? तसेच का ? या प्रश्नांची उकल होण्यासाठी ही प्रयोगशाळेला दिलेली क्षेत्रभेट अत्यंत महत्वाची ठरणार आहे .
ज्योती मुळे मॅडम
मुख्याध्यापिका .