घरांवरील पत्रे उडाले, झाडे पडली, एक बालिका जखमी
( प्रतिनिधी ) पारोडी ता. शिरुर येथे दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे काही घरांवरील पत्रे उडून काही झाले व खांब जमीनदोस्त झाले असताना एका घराचा काही भाग पडून झालेल्या दुर्घटनेत द्रोपदा हरिभाऊ शेंडगे या ऐंशी वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू तर आर्या शेंडगे हि युवती जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली झाला आहे.
पारोडी ता. शिरुर येथे दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी अचानक वादळ सुरु होऊन वादळी पाऊस झाला दरम्यान अचानक सुरु झालेल्या वादळामुळे काही ठिकाणांची झाडे, खांब जमिनीवर कोसळले यावेळी येथील सातकरवाडी तील अशोक शेंडगे यांच्या घरावरील पत्रे उडून जात घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला आणि येथे असलेल्या द्रोपदा शेंडगे व आर्या शेंडगे यांच्या अंगावर कोसळला यावेळी अंगावर भिंतीचा भाग पडल्याने द्रोपदा हरिभाऊ शेंडगे वय ८० वर्षे रा. सातकरवाडी पारोडी ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला तर आर्या किरण शेंडगे हि बालिका जखमी झाली, तसेच पारोडी गावातील पूनम चव्हाण या महिलेच्या घरावर देखील झाड पाडून घराचे नुकसान झाले, घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडलाधिकारी नंदकिशोर खरात, तलाठी आबासाहेब रुके, सरपंच कमल शिवले, उपसरपंच कविता टेमगिरे, अविनाश येळे, पोलीस पाटील कुंडलिक येळे, पोलीस हवालदार अमोल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य बजरंग सातकर, कैलास कोकरे, माऊली टेमगिरे, अक्षय टेमगिरे, रवी टेमगिरे, सुशांत टेमगिरे, सोमनाथ जाधव, विलास गायकवाड, अशोक पवार यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांना तसेच नुकसानग्रस्थांना शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
स्वतंत्र चौकट –
पारोडी ता. शिरुर येथील घटनेची आम्ही मंडलाधिकारी नंदकिशोर खरात यांच्या उपस्थितीत पाहणी करत पंचनामा केला असून सदर पंचनामा अहवाल तहसिलदार यांच्याकडे सादर करणार असल्याचे तलाठी आबासाहेब रुके यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – पारोडी ता. शिरुर येथील वादळाच्या दुर्घटनेत घरावर पडलेले झाड.
सोबत - मृत महिलेचा फोटो.