शिरूर १७ कमानी पुलाजवळ निवडणूक तपास पथकाला एका व्यक्तीकडे १८ लाखाची रोकड सापडली

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
       शिरूर १७ कमानी पुलाजवळ नाकाबंदी दरम्यान एकजण हातात बॅग घेऊन अज्ञात वाहनातून उतरून पळत असताना पळणाऱ्या व्यक्तीला शिरूर एस एस टी पथक व पोलीस कर्मचारी यांनी पाठलाग करून पकडले असून,त्याच्या बॅगेत १८ लाखाची रक्कम सापडली असल्याची माहिती शिरूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली आहे. याबाबत खातरजमा करण्यासाठी आयकर विभागाकडे पाठविण्यात आले आहे.
      हेमत शर्मा (रा. कलीरामपाला मंडी रामदास मथुरा) असे रोकड सापडलेल्या व्यक्तीचे नाव सांगितले आहे. 
        याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरूर १७ कमानी पुलाजवळ निवडणुकीचे नाकाबंदी करत असणारे एस एस स पथक २ प्रमुख एस. ए. मोरे 
यांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक 23 ऑक्टोबर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान नाकाबंदी पथकातील कर्मचारी व पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत असताना चेक नाका जवळून एक व्यक्ती एका अज्ञात वाहनातून उतरून हातात प्रवासी बॅग घेऊन संशयित्या पळताना पथककाला दिसला यानंतर पथकातील कर्मचारी व पोलीस यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व त्याची विचारणा केली आता त्यांनी त्याचे नाव हेमत शर्मा रा. कलीरामपाला मंडी रामदास मथुरा येथील असल्याचे सांगितले. त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगमध्ये पाचशे रुपयाच्या तीन हजार पाचशे नोटा एकूण १७ लाख ५० हजार, दोनशे रुपयांच्या २५० नोटा ५० हजार रुपये असे एकूण १८ लाख रुपये सापडले आहे. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तरे दिली त्यानंतर या नोटा पंचायत समिती जप्त करून,त्याबाबत विधानसभा मतदार संघ १९८ शिरूरचे एमसीसीचे प्रमुख प्रितम पाटील या पैशाबाबत बिल पावती सापडली नसल्याने , या पैशाबाबत खातरजमा करण्यासाठी आयकर विभाग पुणे यांच्याशी संपर्क साधला आहे. तर शिरूर पोलीस स्टेशन यांनाही याबाबत पत्र दिले असल्याची शिरूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर, व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी सांगीतले.
       लोकसभा निवडणुकी काळामध्ये नाकाबंदी मध्ये 51 लाखाहून जास्त रोकड सापडली होती.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!