शिरुरमध्ये रुग्णालयात आलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिस्कामारून पळवले

9 Star News
0
शिरुरमध्ये रुग्णालयात आलेल्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिरुर शहरात उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या महिलेचे मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोघांनी लांबवल्याची घटना घडल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघा दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुवर्णा विनोद पडवळ वय ४१ वर्षे रा. गोलेगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
                            शिरुर शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे सुवर्णा पडवळ या उपचारासाठी आलेल्या असताना पुन्हा घरी जाण्यासाठी निघालेल्या असताना शहरातील मगर हॉस्पिटलजवळ सुवर्णा या आल्या असताना पाठीमागून दुचाकीहून दोघेजण आले त्यांनी सुवर्णा पडवळ यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीहून भरधाव वेगाने निघून गेले, याबाबत सुवर्णा विनोद पडवळ वय ४१ वर्षे रा. गोलेगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!