सरपंच निलेश उमाप यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
( प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी चासकमान कालव्यासाठी गेलेल्या असून त्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना सदर मोबदला देत शेतकऱ्यांची पाणी पुरवठा सोसायटी स्थापन करावी अशी मागणी सरपंच निलेश उमाप यांनी चासकमानच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत केली आहे.
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी चासकमान पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या कॅनॉलसाठी अनेक वर्षांपासून संपादित झालेल्या असून सदर बाधित शेतकऱ्यांना अद्याप त्या जमिनींचा मोबदला मिळाला नसून तो मोबदला शेतकऱ्यांना देत सदर कॅनॉलच्या चारी क्रमांक ११, ११ अ व १२ या चाऱ्यावरती पाणी पुरवठा सोसायटी स्थापन करण्यात याबाबतचे निवेदन सरपंच निलेश उमाप यांनी चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांना दिले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव इंगवले, रमेश उमाप, गणेश कामठे, अनिल इंगवले, शरद उमाप, उमेश ढमढेरे, नवनाथ इंगवले, प्रवीण पटेकर, जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समधान डोके यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो खालील ओळ – जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन देताना सरपंच व आदी.