शिरूर जवळ कानिफनाथ फाटा रोड येथे जमिनीच्या वादातून एकाला उलटी कुऱ्हाड मारुन जखमी केले तर त्याच्या मुलाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याने चार जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नामदेव बाबु थोरात (वय ५१ वर्षे ,रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
धुळा बाबु थोरात, बबन पोपट थोरत, युवराज पोपट थोरात, भिवा बाबु थोरात (सर्व रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून दिनांक १ अक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिरूर गावच्या कानिफनाथ फाटा न्हावरा रोडजवळच असलेल्या ओढयामध्ये घरी जात असताना धुळा बाबु थोरात, बबन पोपट थोरात, युवराज पोपट थोरात, भिवा बाबु थोरात हे सर्व जण पांढ-या रंगाच्या स्विफ्ट गाडीमधुन खाली उतरून मला व माझे मुलाला जमीनीच्या वादावरून मला कु-हाडीच्या उलट्या बाजुने तुंबा मारून जखमी केले व मुलाला हाताने लाथाबुक्क्यानी मारहाण करून मला शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगात करीत आहे.