मांडवगण फराटा येथे ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून साडे नऊ लाख रुपयांची फसवणूक तिघांवर गुन्हा दाखल

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
   मांडवगण फराटा येथे ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून लाखो रुपयांची रक्कम घेऊन मजुर नपुरवता ९ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
   याबाबत बबन बाळासो कोळपे (वय.३८ वर्ष, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
           चंदर ताराचंद राठोड, ताराचंद जयराम राठोड, मुकादम अनिल ताराचंद राठोड, (सर्व रा. पिंपरखेडा, गोरखपुर तांडा, ता. चाळिसगाव, जि. जळगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादिस मजूर पुरवठा करतो असे सांगून ४ जून २३ ते १ ऑक्टोबर २४ दरम्यान एकूण १३ वेळा पी.डी.सी.सी. बँक मांडवगण फराटा, येथून आर.टी.जी.एस, फोन पे वरून एकूण १० लाख ९० हजार रूपये पैसे पाठवले परंतु मजुर पुरवठा केला नसल्याने त्यास मजुर कधी येणार आहेत याबाबत चौकशी केली असता तो आम्हाला सांगत होता की, मजूर लवकरच घेवून येतो मजूर त्याचे नातेवाईकांना भेटण्यासासठी गेले आहेत तिकडे आल्यावर परत सहा महिने भेट होत नाही ते आले की मी कारखाना चालू होण्याचे अगोदर पंधरा दिवस घेवून येतो असे सांगितले. त्यानंतर त्याने मी पिंपरखेडा, गोरखपूर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे गेलो असता. त्यावेळी मुकादम अनिल राठोड यांने सांगितले की, दोन दिवसात मजूर घेवून जावू असे म्हणाला म्हणून मी तिथेच मुक्कम केला त्यानंतर दोन दिवसांनी मी मुकादम अनिल राठोड यांस विचारले की दोन दिवस झाले मजूर कधी येणार आहेत असे विचारले असता त्याने सांगितले की, मजूर घरी नाही ते कोठे गेले आहेत माहीत नाही असे सांगितले त्यावेळी राठोड हा मला म्हाणाला की तूम्ही अजून एक दिवसा थांबा मी तूम्हाला पाच मजूर भरून देतो असे म्हणला त्यामुळे मी पुन्हां एक दिवस मुक्कम केला दुस-या दिवशी मी त्यांना मजूरांबद्दल विपचारना केली असत मला म्हणाले की, सध्या मजूर कोणीच नाही आम्ही तुमचे पैसे परत देतो असे म्हणून चंदर राठोड यांने मला रोख रक्कम लाख रूपये दिले त्यानंतर मुकादम अनिल राठोड याने ४० हजार रूपये फोन पे वरू पाठविले त्यानंतर त्यांना वारंवार मी मजूर देणे कामी दिलेले पैसे मागितले असता देतो असे म्हणत असून आज रोजी पर्यंत माझे राहिलेले ९ लाख ५५ हजार रुपये चंदन राठोड ,ताराचंद राठोड ,मुकादम अनिल राठोड यांनी नदेता माझी फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम करीत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!