भारतीय जनता पक्षाचे शिरूर हवेलीचे नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी शिरूर हवेलीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला असून हा निर्धार नसून एल्गार आहे. हा एल्गार राहणार की तलवार म्यान होणार हे पुढील काळात दिसून येणार आहे.
प्रदीप कंद यांनी या निवडणुकीतून माघार घेतली तर पुढील काळात त्यांच्या राजकारणालाही उतरती काळा लागणार आहे त्यामुळे यंदा त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणे गरजेचे असल्याचे मत राजकीय जाणकारांचे आहे.
काल दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पेरणे फाटा येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निर्धार मेळावा घेऊन "मला तुमच्याशी बोलायचे आहे" या धर्तीवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती या बैठकीला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहून प्रदीप कंद यांच्या पाठीमागे ताकद उभे करण्याचे ठरवले आहे.
आज संदीप भोंडवे यांच्या भाजप संपर्क कार्यालयात निवडणुकीचे नियोजन बैठक होणार आहे गेली अनेक वर्ष भाजपआमदार तसेच भाजपचे हवेलीतील प्रथम आमदार म्हणून कायम चर्चेत असलेले प्रदीप कंद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले असून नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे होता, स्व .बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर भाजपकडे संभाव्य उमेदवार म्हणून प्रदीप कंद यांचेकडे शिरूर हवेली ची जनता पाहत होती. त्यांनी ग्राउंड लेव्हलवर मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी व पक्षाचे काम सुरू केले होते परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीला न सुटल्याने. भाजप कार्यकर्ते व प्रदीप कंद यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
आज तरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले असले तरी ही बंडखोरी त्यांच्यासाठी आवश्यक असून करो या मरो अशी स्थिती त्यांना यावेळेस करावीच लागेल अन्यथा पुढील काळामध्ये हवेलीचे नेतृत्व दुसरीकडे जाईल व प्रदीप कंद यांचे राजकारणाला उतरतीकळा लागल्याशिवाय राहणार नाही.
प्रदीप कंद गेली तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या जवळ होते परंतु तीनही वेळा त्यांना हुलकावणी मिळाली आहे यंदा भारतीय जनता पार्टी कडून एक तरुण उमदा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायची परंतु यावेळी त्यांच्या पदरी घोर निराशा
पवित्र आणि पूजनीय गोमतेच्या आशीर्वादाने आपण दिवाळीची सुरुवात करुया...
वसुबारसच्या सर्वांना *केवल कुंज* परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा!
नव्या युगातलं पुढचं पाऊल ! 🌎👣
*केवळ कुंज* येथे छोट्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा सजलेले *1BHK, 2BHK* आणि *3BHK* फ्लॅट्स उपलब्ध !🏢✨
🔹 आजच बुक करा! 🏡
*केवल कुंज*
पत्ता: पुणे - नगर बायपास रोड,
टेलीफोन एक्सचेंज समोर, शिरूर, पुणे 412210
📞 संपर्क: *8272 8272 45 / 8272 8272 75*
