गरिबांची दिवाळी म्हणजेच शिक्षकांची दिवाळी - अनिल साकोरे
केंदूर मध्ये गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप
( प्रतिनिधी ) दिवाळी म्हणजे प्रत्येकाचा आवडता तसेच विद्यार्थ्यांच्या आनंदाचा क्षण असून गोरगरीब विद्यार्थ्यांचा आनंद म्हणजे आमचा आनंद आणि गोरगरीब विच्यार्थ्यांची दिवाळी म्हणजेच आम्हा शिक्षकांची दिवाळी असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले आहे.
केंदूर ता. शिरुर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व जुनिअर कॉलेज विद्यालयात दिपावलीच्या पूर्वसंध्येला गरीब परंतु होतकरु विद्यार्थी व विद्यार्थिनींना ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले,याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सविता पऱ्हाड, सरपंच अमोल थिटे, उद्योजक प्रमोद पऱ्हाड, संस्थेचे पुणे विभागीय सदस्य राम साकोरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सतीश थिटे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संदीप सुक्रे, माता पालक संघ उपाध्यक्ष मयुरी खर्डे, श्रीहरी पऱ्हाड, माजी उपसरपंच अभिजित साकोरे, बन्सी पऱ्हाड यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करत समाजाला आगळावेगळा संदेश देण्यात आला, तर यावेळी मिठाई घेताना विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ सुक्रे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले आणि ज्येष्ठ शिक्षक महादेव पाटील यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – केंदूर ता. शिरुर येथील विद्यालयात गोरगरीब विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करताना पदाधिकारी.