शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुण्याचे नगरसेवक शांताराम कटके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागते का ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय शांताराम कटके यांच्या या उमेदवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
१९८ शिरूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज सकाळीच शांताराम कटके यांनी श्री वाघेश्वरांचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन शिरूर येथील बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यात पुष्पहार घालून रॅली काढून आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
महायुतीचे बंडखोर उमेदवार शांताराम कटके यांनी अपक्ष अर्ज भरला असून,
शिरुर विधानसभा निवडणुक रंगतदार होणार असून महायुतीची शिरुर येथील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर करताच अनेकांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुण्याचे नगरसेवक व अपक्ष उमेदवार शांताराम कटके म्हणाले मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्ष आणि अजित पवार यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. परंतु शिरूर विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही. व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या समोर एक आयात उमेदवार पक्षाने दिला असून त्यामुळेच मी माझी उमेदवारी दाखल केली आहे. आणि ही उमेदवारी कायम असल्याचा विश्वासही त्यांनी दिला असून, ही निवडणूक एका अपप्रवृत्ती जो वृद्ध वयस्कर लोकांचा सन्मान करत नाही त्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
------------------- -----------
पवित्र आणि पूजनीय गोमतेच्या आशीर्वादाने आपण दिवाळीची सुरुवात करुया...
वसुबारसच्या सर्वांना *केवल कुंज* परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा!
नव्या युगातलं पुढचं पाऊल ! 🌎👣
*केवळ कुंज* येथे छोट्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा सजलेले *1BHK, 2BHK* आणि *3BHK* फ्लॅट्स उपलब्ध !🏢✨
🔹 आजच बुक करा! 🏡
*केवल कुंज*
पत्ता: पुणे - नगर बायपास रोड,
टेलीफोन एक्सचेंज समोर, शिरूर, पुणे 412210
📞 संपर्क: *8272 8272 45 / 8272 8272 75*