शिरसगाव काटा ता.शिरूर येथील एका पन्नास वर्षे महिलेला तुझा भाचा कुठे आहे असा प्रश्न विचारत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पन्नास वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.
रामा केशव केदारी , मन्या उर्फ अदित्य रामा केदारी, सोन्या बापु केदारी, सखाराम बापु केदारीने (सर्व रा. शिरसगाव काटा , ता.शिरूर)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीपुढीप्रमाणे दिनांक २८ सप्टेंबरला सायंकाळी सुमारास हौसाबाई कोळपे या मच्छिंद्र कुलाळ यांच्या टपरीमध्ये माचीस आणन्यासाठी जात असताना कॅनॉल वरील पुलावर त्यांच्या गावातील रामा केशव केदारी , मन्या उर्फ अदित्य रामा केदारी, सोन्या बापु केदारी , सखाराम बापु केदारी हे सर्वजन कॅनाल वरील पुलाजवळ उभे होते.हौसाबाई कोळपे या पुलावरून जात असतांना त्यांना रामा केदारी यांनी विचारले की, तुझा भाचा सागर गोरे हा कोठे आहे. असे विचारले असता या महिलेने मला माहिती नाही असे उत्तर दिले. यावेळेस या चौघनी या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केला यावेळी महिलेने आरडाओरड केला असता परिसरातील लोकांनी तिला वाचवण्याच्या प्रयत्न केला. लोक येताच हे चौघे तेथून पळाले. फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी करीत आहे.