शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुतणे माजी नगरसेवक नितीन पाचर्णे आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकारणाला वेग आला आहे . माजी नगरसेवक नितीन पाचर्णे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार का ? याकडे शिरूर हवेलीचे लक्ष लागून राहिले आहे.
परंतु ही वेध सदिच्छा असल्याचे माजी नगरसेवक नितीन पाचर्णे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून ते भाजप पक्षातही नाराज असल्याची चर्चा होती परंतु आज अचानक ते अजित पवारांच्या भेटीला गेल्याने ते नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार यांच्या प्रवेश करतात का ? हे पाहणे गरजेचे आहे.
त्यात काल नितीन पाचर्णे त्यांचे बंधू व माजी आमदार स्व.बाबूराव पाचर्णे यांचे पुतणे जगदीश पाचर्णे यांनीही शिरूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे नक्की पाचर्णे यांच्या गोठात मध्ये काय चालू आहे हे सांगणे आता तरी कठीण आहे.
याबाबत काल राज्याची उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा माजी नगरसेवक नितीन पाचर्णे यांना फोन करून मुंबई येथे भेटण्यासाठी बोलावले असल्याचे सांगण्यात आले आहे.
आज सकाळीच राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अर्धा तास वेळ देऊन स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांनी तालुका चांगला सांभाळला आहे. त्यांच्यानंतर राहुल व नितीन पाचर्णे तुम्ही तालुक्यात लक्ष घालावे असे सांगून,
शिरूर विधानसभेसाठी काम करावे यापुढील काळामध्ये अजित पवार नेहमीच पाचर्णे कुटुंबियांच्या पाठीशी राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
हे तरी खरे असले तरी नितीन पाचर्णे राष्ट्रवादीत प्रवेश करतील का ? याबाबत ठोस माहिती त्यांनी दिली नसून , केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगीतले.
यावेळी शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक दादा पाटील फराटे, शिवसेनेचे नेते माजी सरपंच रामभाऊ सासवडे, शिरूर पंचक्रोशी नेते अनिल पोटावळे, सागर सातारकर , ग्रामपंचायत सदस्य प्रज्योत पाचर्णे ,विजय पाचर्णे ,हनुमंत घाडगे उपस्थित होते