पिंपरखेड ता . शिरूर येथील हॉटेल विसावाच्या मॅनेजरला एक लाख रुपये दे अशी मागणी करून ते देण्यास नकार दिल्याने मॅनेजरवर धारदार कोयत्याने डोक्यात हातावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हरेश ठकाजी चोरे (वय. 45 हॉटेल मॅनेजर रा. जांबुत ता. शिरुर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रशांत सारंगकर शिरसाठ (रा. ढोमेमळा, पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २९सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे गावच्या हद्दीतील विसावा हॉटेल बिअर बार याठिकाणी प्रशांत सारंगकर शिरसाठ हॉटेल मॅनेजर कडे एक लाख रुपये मागीतले ते त्याला दिले नाही म्हणुन त्याने हॉटेल मॅनेजर हरेशयाला जिवे ठार मारण्याच्या उद्देषाने त्याच्या हातातील कोयत्याने डाव्या हाताच्या कोप-यावर व डोक्यात वार करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहे.